तोडकर हवामान अंदाजानुसार आज, २३ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील वातावरणात महत्त्वपूर्ण बदल जाणवत आहे. मागील काही दिवसांमध्ये गारव्यामुळे (थंडीमुळे) कमी झालेले तापमान आता वाढायला सुरुवात झाली आहे. २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळपासून पुढील साधारण चार दिवस थंडीचा जोर कमी राहील. मात्र, त्यानंतर २८ किंवा २९ नोव्हेंबरच्या सुमारास थंडी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. या दरम्यान, आकाशात ‘खवल्या-खवल्याचे’ ढग पाहायला मिळतील आणि दिवसाचा कालावधी लवकर संपल्यासारखा वाटेल.
या काळात अवकाळी (Unseasonal Rain) पावसाची मोठी सिस्टीम आता कार्यरत नाही. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. परंतु, पावसाची शक्यता केवळ २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित असून, तोही तुरळक ठिकाणीच पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देणे बंद न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
तसेच, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या प्रमुख कृषी भागांमध्ये पुढील दोन-तीन दिवसांत सकाळच्या वेळी दाट धुई (Fog/Mist) येण्याची शक्यता आहे. तापमान वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी आणि इतर कामे पूर्ण करून घ्यावीत. (तोडकर)
पुढील वातावरणावर परिणाम करणारी एक नवी सिस्टीम २८ किंवा २९ नोव्हेंबरच्या आसपास बंगालच्या उपसागरात सक्रिय होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते विशाखापट्टणमसारख्या भागावर धडकेल. या सिस्टीमच्या प्रभावामुळे, महाराष्ट्रात ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरच्या आसपास पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार होईल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सिस्टीम महाराष्ट्रात मोठे नुकसान करणारा पाऊस देईल का, याबाबत सध्या कोणतेही निश्चित अंदाज मॉडेलमध्ये दिसत नाहीत, कारण मान्सूनोत्तर हवामान सिस्टीमचा मार्ग (ट्रॅक) अस्थिर असतो. (Todkar habaman andaj)
हिवाळ्याबाबत बोलायचं झाल्यास, यावर्षी थंडी खूप चांगली आणि कडक्याची राहणार आहे. २६ नोव्हेंबरपासून थंडीची एक लाट पुन्हा सक्रिय होईल, जी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे काहीशी कमी होऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुढील १५ दिवसांपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पिकांचे नुकसान होईल अशी कोणतीही गंभीर हवामान स्थिती (कंडिशन) तयार होण्याची शक्यता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही असेही तोडकर म्हनाले.