माझी कन्या भाग्यश्री योजना ; या मुलींना मिळनार 50 हजार अनुदान ; महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजने’ संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2023 पूर्वी जे अर्ज पात्र असूनही विविध कारणांमुळे मंजूर झाले नव्हते, अशा अर्जदारांना आता मंजुरी मिळाली आहे. या प्रलंबित अर्जांना लाभ देण्यासाठी, यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (जीआर) नुकताच, म्हणजेच 21 नोव्हेंबर 2025 रोजी, निर्गमित करण्यात आला आहे.
1 ऑगस्ट 2017 पासून राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना लागू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत एका मुलीसाठी 50,000 रुपये आणि दोन मुली असल्यास प्रत्येकी 25,000 रुपये इतके अनुदान मुलीच्या नावे बँकेमध्ये जमा करण्याची तरतूद होती. मात्र, 30 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाने ‘लेक लाडकी योजना’ सुरू केल्यामुळे, 1 एप्रिल 2023 पूर्वी जन्मलेल्या मुलींचे अनेक अर्ज प्रशासनाकडे प्रलंबित राहिले होते. या अर्जांना निधी मंजूर न झाल्यामुळे अनेक पात्र लाभार्थी अनुदानासाठी प्रतीक्षेत होते.
















